Maharashtra Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे ) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता भाजपशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांनी केला आहे. सुजय विखेंचे वक्तव्य राहुरीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना (Maharashtra Politics) सुजय विखे म्हणाले, “पूर्वी माझ्या कारखान्याची ऊसतोड एखाद्या शेतात गेली, तर ती तनपुरे गटाची की विखे गटाची, अशी चर्चा व्हायची. मात्र आता मी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. कोणत्याही बांधावर गेलात तरी आता फक्त ‘कमळ’च दिसेल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी ही राजकीय व्यूहरचना केली आहे. “पूर्वी ‘कमळा’साठी फक्त एका ‘दादा’ला (सुजय दादा) धावपळ करावी लागायची. आता मात्र अक्षय दादा, प्राजक्त दादा आणि सुजय दादा असे तीन दादा एकत्र आले आहेत,” असे म्हणत विखे यांनी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली. Sujay Vikhe-Patil प्रवेशाचे संकेत कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केल्यावर सुजय विखे म्हणाले, “आता कोणाला एकट्याला पक्षात घ्यायचे नाही, तर सर्वांना ‘पॅकेज’ स्वरूपात सोबत घ्यायचे आहे.” या विधानातून प्राजक्त तनपुरे यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्याचे संकेत दिले गेले आहेत. प्राजक्त तनपुरे यांची पार्श्वभूमी प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या होत्या. त्यावेळी तनपुरे यांनी या चर्चांना फेटाळून लावले होते. मात्र सुजय विखे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. अपक्ष उमेदवार महेश हापसेंची सक्रिय प्रचार मोहीम दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. महेश हापसे यांचा प्रचार वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. ते सायकलवरून गावोगावी फिरत मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर खर्च वाचवण्यासाठी आणि जनतेशी थेट जोडले जाण्यासाठी सायकलचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतरच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे हापसे यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोणी आणि बारामती येथील विकास पाहिल्यानंतर राहुरीतही तशाच प्रगतीची गरज असल्याची भावना व्यक्त करत, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणूक (Maharashtra Politics) लढवत असल्याचा विश्वास महेश हापसे यांनी व्यक्त केला.