अपक्ष म्हणून निवडणून आलेल्या विशाल पाटलांचा काॅंग्रेसला पाठिंबा

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचे पाहायला मिळाले. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला.
विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर गुरुवारी विशाल पाटीलांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. आमदार विश्वजीत कदम देखील या वेळी उपस्थित होते.
People of Maharashtra defeated the politics of treachery, arrogance and division.
It is a fitting tribute to our inspiring stalwarts like Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule and Babasaheb Dr Ambedkar who fought for social justice, equality and freedom.… pic.twitter.com/lOn3uYZIFk
— Mallikarjun Kharge (@kharge) June 6, 2024
दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत विशाल पाटील यांनी त्यांना पाठींब्याचे पत्र दिले. यावेळी पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचे भेटून अभार मानले. आम्ही उमेदवारीसाठी अटीतटीची प्रयत्न केले. मी कुठलीच शर्थ न ठेवता मी पाठींबा जाहीर केला. मी काँग्रेस सोबत राहणार आहे, असेही ते म्हणाले.
सोनियांचीही घेतली भेट –
खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली. दिल्लीतील त्यांच्या 10 जनपथ या बंगल्यावर भेट झाली.





