Maharashtra politics : ‘जो कार्यक्रम इंदापूरला झाला, तोच फलटणला होणार…’; आणखी एक बडा नेता तुतारी हाती घेणार

Sharad Pawar । Ramraje Naik Nimbalkar : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज असून, ते आता अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
लवकरच घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतंच फलटण जवळच्या खटके वस्ती इथं कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता.
तेव्हा कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचं रामराजे यांनी म्हटलं होत. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवारांची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, रामराजे नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2015 ते 2016 आणि 2016 ते 7 जुलै 2022 या कालावधीत ते विधान परिषदेचे 13 अध्यक्ष होते.
दरम्यान, अश्यातच स्वतः शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. इंदापूर मध्ये बोलताना शरद पवारांनी अजित पवार यांना जोरदार धक्का देणारा संकेत दिल्याचे पाहायला मिळाले.
14 ऑक्टोबर रोजी फलटण येथे जाणार असल्याचे सांगत शरद पवार यांच्याकडून रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचे संकेत देण्यात आले.
ते म्हणाले, “आता मी फलटणला जाणार आहे. जो कार्यक्रम इंदापूरला झाला, तोच फलटणला घेणार आहे. तिथे महिनाभर कार्यक्रम बुक आहे. सर्वजण एकत्र येत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.





