Maharashtra Politics : खळबळजनक ! काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला बिश्नोई गँगकडून धमकी
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना (Maharashtra Politics) अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी आल्याने खळबळ उडाली.

Maharashtra Politics : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना (Maharashtra Politics) अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी आल्याने खळबळ उडाली. साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकीचे फोन येत असल्याचा मुद्दा विधानसभा सभागृहात उपस्थित करण्यात आला.
सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार पठाण यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी काॅंग्रेसने केली आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे याला फोन करून साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही तर आज 2 जुलै रोजी दुपारी दोन वाजता तुम्हाला दाखवून देऊ अशी धमकी दिली. सभागृहात विजय वडेट्टीवार म्हणाले, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता साजिद पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉल आला. स्वतःला शुभम लोणकर असे सांगणाऱ्या व्यक्तीने आपण बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितले आणि १० कोटी रुपयांची मागणी केली.
खंडणी दिली नाही तर हत्या करण्याची धमकी दिली आहे पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली.त्यांनी पुढे सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली तरी महिनाभर-दोन महिने संरक्षण मिळेल; मात्र, सहा महिने किंवा वर्षभरानंतर ठार मारू, अशी उघड धमकी दिली.
त्यानंतर काल पुन्हा धमकी देण्यात आली आहे.काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून ही दुसरी धमकी आली आहे. दोन दिवसापूर्वी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून बिश्नोई गँग माध्यमातून धमक्या देत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता.






