Maharashtra Politics : राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांचे कार्यालय जाळले; राज्यात मोठी खळबळ
Maharashtra Politics : बीडच्या वडवणीत राष्ट्रवादी (शरद पवार) तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांचे संपर्क कार्यालय अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवून दिले. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातील वडवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांच्या संपर्क कार्यालयाला अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फायली, फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
ही घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वडवणीतील वसंतराव नाईक चौक परिसरात घडली. कार्यालयातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले होते. (Maharashtra Politics)
या जाळपोळीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती कार्यालयाला आग लावताना दिसत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. (Maharashtra Politics)
घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेमागे राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही कारण, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. (Maharashtra Politics)
तालुकाध्यक्षांच्या कार्यालयावर झालेल्या या हल्ल्यामुळे वडवणी शहरासह बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (Maharashtra Politics)





