Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली? खळबळजनक दावा
Maharashtra Politics: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका पाहता, दोन्ही गटांतील महिला नेत्यांमधील हा वाद आगामी काळात अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. शितल म्हात्रे यांच्या या 'कॉलर' दाव्यावर आता ठाकरे गटाकडून काय अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: शिवसेनेच्या दोन्ही गटांतील वाकयुद्ध आता टोकाला पोहोचले असून, शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची कॉलर पकडल्याची चर्चा असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे विरुद्ध शितल म्हात्रे: ट्विटरवर जुंपली-
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शितल म्हात्रे यांच्यात सध्या जोरदार ‘ट्विटर वॉर’ सुरू आहे. अंधारे यांनी विधान परिषदेच्या आगामी जागांच्या पार्श्वभूमीवर शितल म्हात्रे आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली होती. “शिंदे यांची भाटगिरी अधिक तीव्रतेने करण्यासाठी म्हात्रे आणि गोऱ्हे जोमाने कामाला लागल्या आहेत,” असा टोला अंधारे यांनी लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना शितल म्हात्रे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत ठाकरे गटाच्या अंतर्गत वादावर बोट ठेवले.
काय आहे नेमकं प्रकरण?
शितल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची जागा घेण्यावरून आणि शरद पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीवरून ठाकरे गटात नाराजी असल्याचे सूचित केले. त्यांनी लिहिले की, “आदू बाळाने (आदित्य ठाकरे) गेल्या आठवड्यात राऊतची (संजय राऊत) कॉलर धरली म्हणे.” राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, त्यावरच म्हात्रे यांनी हा दावा केला आहे.
ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल??? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला…आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा???
त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची… https://t.co/Fu7el0qaJ3— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 26, 2026
‘मातोश्री’च्या चापलूसीवरून टीका-
म्हात्रे यांनी अंधारे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना म्हटले की, “विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? खासदार-आमदार होण्याची स्वप्ने आता सोडून द्या.” अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केल्यामुळे म्हात्रे यांनी “तुमच्या राजकीय जीवनातील अंधार काही दूर होणार नाही,” असे म्हणत अंधारे यांना लक्ष्य केले.
दरम्यान, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका पाहता, दोन्ही गटांतील महिला नेत्यांमधील हा वाद आगामी काळात अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. शितल म्हात्रे यांच्या या ‘कॉलर’ दाव्यावर आता ठाकरे गटाकडून काय अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




