Maharashtra Politics : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनाने निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे व सुनेत्रा पवार दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्धवट सोडून दिल्ली गमन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी (१ एप्रिल २०२६) दिल्ली दौऱ्यावर जाण्याचा कार्यक्रम ठेवला. दोघेही एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटींमुळे राजकीय अटकळींना उधाण आले आहे. संजय राऊतांचा ‘बॉम्ब’ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार व फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी गुरुवारी (२ एप्रिल २०२६) पत्रकार परिषदेत मोठा दावा करत राज्य राजकारण ढवळून काढले. राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील २५ ते ३० आमदार आणि एकनाथ शिंदे गटातील तितकेच (२५-२५) आमदार असे एकूण ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.” Maharashtra Politics ते पुढे म्हणाले, “हे सर्व आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना सध्या ‘वेट अँड वॉच’ सांगण्यात आले आहे.” या दाव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी व शिंदे शिवसेना विलीन होणार? संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांना लवकरच विलीन व्हावे लागणार आहे.” राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष असल्याचे सांगत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या भविष्याबाबत शंका व्यक्त केली. “नवीन रचनेत सुनेत्रा पवार यांचे ते सहकारी असतीलच असे नाही,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात सुरू असतानाच, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दोन खासदारांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ला उपस्थिती दर्शवली. खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख या डिनरला हजर होते. यामुळे ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात जाण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून बैठक घेतली होती. मात्र परभणीचे खासदार संजय जाधव या बैठकीला गैरहजर राहिले होते. आता आणखी दोन खासदारांच्या हालचालींमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात निधनानंतर राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) अस्थिर झाले आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले असले तरी पक्षांतर्गत आणि महायुतीतील समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे. संजय राऊत यांचा दावा खरा ठरला तर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.