Police Recruitment : राज्यात ८ हजारांहून अधिक जागांसाठी पोलीस भरती होणार; कधीपासून होणार सुरुवात?
Police Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी व आनंदाची बातमी समोर आली आहे.

Police Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून ८,१०० पोलीस अंमलदारांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. (Police Recruitment)
जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या पदांचा विचार करून ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जानेवारी २०२७ पासून भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, त्याआधी डिसेंबर २०२६ मध्ये उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. राज्यात दरवर्षी लाखो तरुण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे ८,१०० पदांची ही भरती इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. (Police Recruitment)
सोलापूर जिल्ह्यात ११७ जागा (Police Recruitment)
या भरतीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांनुसार भरती केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ११७ पोलीस अंमलदारांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आहे. (Police Recruitment)
इतर जिल्ह्यांमध्येही उपलब्ध रिक्त पदांनुसार जागा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संबंधित अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हानिहाय पदसंख्या आणि पात्रतेची माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Police Recruitment)
असा असेल पोलीस भरतीचा संभाव्य कार्यक्रम (Police Recruitment)
एकूण पदे : ८,१०० पोलीस अंमलदार
अर्ज भरण्याची मुदत : १ ते ३१ डिसेंबर २०२६
भरती प्रक्रिया : १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७
उमेदवारांनी काय काळजी घ्यावी?
भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, आरक्षण, अर्ज शुल्क आणि जिल्हानिहाय रिक्त पदांची अंतिम माहिती स्पष्ट होईल. (Police Recruitment)
त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि धावण्याच्या सरावावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. (Police Recruitment)






