Monsoon Update : बळीराजासाठी मोठी गूड न्यूज! अखेर मान्सून तळकोकणात दाखल; पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
Monsoon Update : चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी राजासाठी अखेर आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे.

Monsoon Update : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून तो लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)
यंदा मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने, म्हणजे 4 जून रोजी दाखल झाला होता. मात्र त्यानंतर त्याच्या प्रगतीला वेग आला आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा पार करत मान्सून आता कोकण किनारपट्टीवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्येही पुढील काही दिवसांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Monsoon Update)
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी या पावसामुळे गारवा निर्माण झाला असला तरी शेतमालाचे नुकसानही झाले होते. आता मात्र मान्सूनच्या अधिकृत आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Monsoon Update)

Monsoon Update : बळीराजासाठी मोठी गूड न्यूज! अखेर मान्सून तळकोकणात दाखल; पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)
दरम्यान, राज्यातील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन कोकणापासून विदर्भापर्यंत तब्बल 25 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Monsoon Update)





