Maharashtra Police Transfers : राज्यातील 7 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक ठिकाणी मोठा प्रशासकीय फेरबदल
Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि नव्या पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत.

Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 च्या शिफारशींनुसार सात अधिकाऱ्यांच्या बदली व नव्या पदस्थापना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22-न अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Police Transfers)
या फेरबदलांमुळे मुंबई, पुणे अमरावती, नागपूर आणि मीरा-भाईंदर वसई-विरार परिसरातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणात हालचाल झाली आहे. त्याचबरोबर अमरावती पोलीस आयुक्तालयातही स्वतंत्रपणे 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून विविध शाखा आणि पोलीस ठाण्यांमध्ये नव्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Police Transfers)
- मुंबईच्या दक्षिण विभागाचे पोलीस उपआयुक्त दिनेश गिरिधर बारी यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- नागपूर येथील अँटी नक्षल टास्क फोर्स (ANTF) मधील अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांची पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-1, अमरावती शहर येथे बदली करण्यात आली आहे.
- नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले संदीप जाधव यांची पोलीस अधीक्षक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक शशिकांत देवराज बोराटे यांची पोलीस उपआयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- स्मिता अभिषेक पाटील, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांची उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (सागरी सुरक्षा) या पदावर बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, 15 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या काही बदल्यांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. मितेश घट्टे यांची यापूर्वीची बदली रद्द करून त्यांना पोलीस उपआयुक्त, मुंबई शहर येथे पदस्थापना देण्यात आली आहे. (Maharashtra Police Transfers)
Maharashtra Police Transfers : राज्यातील 7 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक ठिकाणी मोठा प्रशासकीय फेरबदल
तसेच वैशाली माने, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे यांचीही 15 मे रोजी झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांना सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले असून त्यांच्या पुढील पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत. (Maharashtra Police Transfers)
अमरावती पोलीस आयुक्तालयातही मोठ्या प्रमाणात अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून गुन्हे शाखेचे विभाजन करण्यात आले आहे. तसेच दोन महिला पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यांचा प्रभार देण्यात आल्याने या फेरबदलाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. (Maharashtra Police Transfers)





