Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : भाजपची जोरदार मुसंडी ; ४८ पैकी १५ जागांवर आघाडी
Updated On:

Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे कल हाती येत आहेत. त्यात काही ठिकाणी अनपेक्षित कल समोर येत आहेत. दरम्यान, भाजपने सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुसंडी घेतली आहे. भाजपने 15 जागांवर आघाडी घेतली आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने १५ जागांवर आघाडी घेतलीय. यात मुंबईत तीन जागा, कोकण-ठाण्यात दोन जागा, पश्चिम महाराष्ट्रात दोन जागांवर, मराठवाड्यात २ जागांवर, उत्तर महाराष्ट्रात ३ जागांवर आघाडीवर, विदर्भातील ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
लोकसभेची ही निवडणूक उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर भाजपच्या कामगिरीकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.





