Maharashtra Lok Sabha Result 2024 : काँग्रेसची महाराष्ट्रात उसळी ; 11 जागांवर आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 निकाल आज जाहीर होत आहे. महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने, महायुती की महाविकास आघाडी याचा निकाल जाहीर होत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असले तरी राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल हे अत्यंत धक्कादायकपणे समोर येत आहेत. त्यात काँग्रेसने राज्यात चांगली उसळी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना होत आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली उसळी घेतल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने राज्यातील 11 जागांवर आघाडीवर आहे.
भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना 10 जागांवर आघाडीवर असून, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 1 आघाडीवर आहे. सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील हे आघाडीवर आहेत.





