MLC Election : विधान परिषदेसाठी उद्या होणार मतदान; ११ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात
MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित ११ जागांसाठी उद्या, गुरुवार १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे.

MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित ११ जागांसाठी गुरुवार, १८ जूनला मतदान होणार असून राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. (MLC Election)
या निवडणुकीत एकूण ३१ उमेदवार रिंगणात असून ७०४३ मतदार त्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय घेणार आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (MLC Election)
या निवडणुकीसाठी एकूण १७ जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी महायुती आणि मविआ यांच्यात उर्वरित ११ जागांवर थेट लढत रंगणार आहे. (MLC Election)
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड, सोलापूर, परभणी-हिंगोली, नांदेड, सांगली-सातारा, अमरावती आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बहुतांश ठिकाणी त्रिकोणी लढतीचे चित्र दिसत असून जळगावमध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. (MLC Election)

सोलापूर, नागपूर आणि धाराशिव-लातूर-बीड येथे थेट लढती अपेक्षित आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होणार असून, त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. (MLC Election)





