Maharashtra IPS Transfers : राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिसवे गुप्तवार्ता विभागात, तर शारदा निकम नार्कोटिक्स फोर्समध्ये

मुंबई : महाराष्ट्र शासनाने आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. नव्या सरकारच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील बदल्यांच्या मालिकेत आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश झाला आहे.
या बदल्यांमध्ये रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. शिसवे याआधी मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तपदी कार्यरत होते.
शारदा वसंत निकम यांना अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले असून ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
निसार तांबोळी, जे याआधी नागपूरचे पोलिस सहआयुक्त होते, त्यांची बदली राज्य राखीव पोलिस दलाच्या विशेष महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. तसेच एन. डी. रेड्डी, सध्या अमरावतीचे पोलिस आयुक्त, यांना नागपूर पोलिस सहआयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
निसार तांबोळी – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर
एन डी रेड्डी – पोलिस सहआयुक्त, नागपूर
सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना
राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन
डॉ. आरती सिंह यांच्या बदलीचे आदेश जरी जाहीर झाले असले तरी त्यांचं नवीन पदस्थापन अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. याची स्वतंत्र घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.





