Maharashtra Election : निकालाआधी महायुतीचे नेते देवदर्शनाला ! रक्षा खडसे, श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीचरणी लीन

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार काही पोलमध्ये ‘महायुती’ला तर काही पोलमध्ये ‘महाविकास आघाडी’ला जास्त जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दोन्ही आघाडीला आपल्यालाच जास्त जागा मिळतील अशी आशा आहे.
त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळवीची तयारी सुरु केली आहे. बंडखोर, अपक्ष यांना आपल्याशी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष हे या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निकालाआधी महायुतीचे नेते देव दर्शनाला पोहोचले असल्याचं दिसून येत आहे. रक्षा खडसे, श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीचरणी नतमस्तक झाले आहेत. सोशल मीडियावर या नेत्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
#WATCH | Tirumala, Andhra Pradesh: Union Minister Raksha Khadse visited the Tirumala Sri Venkateswara Temple pic.twitter.com/W58i97lfoS
— ANI (@ANI) November 22, 2024
#WATCH | Tirumala, Andhra Pradesh: Shiv Sena MP Srikant Shinde offered prayers at the Tirumala Sri Venkateswara Temple pic.twitter.com/7QH4y1l8wu
— ANI (@ANI) November 22, 2024
मतदानाची टक्केवारी वाढली…
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले, गेल्या 30 वर्षातील निवडणुकांचा आढावा घेतल्यास यंदा सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती आहे. सन 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.
अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 65.10 टक्क्यांपर्यंत गेल्याचे समजते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52.07 टक्के मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.





