Maharashtra Drought : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; ७५% महाराष्ट्रात १२ सवलती लागू, पंचनाम्यांचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Drought : महाराष्ट्रातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती (Triggers-1) जाहीर करण्यात आली असून शासनाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

Maharashtra Drought : राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुष्काळाची दाहकता अनुभवत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Drought)
या तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी मदतीच्या केंद्रस्थानी आहेत. (Maharashtra Drought)
त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. या आव्हानावर मात करण्यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करू, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. (Maharashtra Drought)
फडणवीस यांनी नुकताच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्या अनुषंगाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला. (Maharashtra Drought)
राज्याचे कृषि आयुक्त यांनी खरीप 2026 च्या हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला. त्यामुळे आता या राज्यातील तालुक्यामध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीबाबत दुष्काळाबाबतच्या ट्रीगर- १ (प्रथम कळ) अनुषंगाने पंचनामे करण्यात येणार आहेत. (Maharashtra Drought)
सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत विहित कार्यपद्धतीची पूर्तता झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर करण्यात येणार आहे. (Maharashtra Drought)
त्यामुळे पंचनामे व पीक परिस्थितीचे अचूक सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेला शासनाने विशेष महत्त्व दिले आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर फडणवीस यांनी या तालुक्यांमधील परिस्थितीबाबत तत्काळ पंचनामे सुरु करावेत, असे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले. (Maharashtra Drought)
यासाठी महसूल विभाग, कृषि तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि समन्वयाने काम करावे. त्यासाठी क्षेत्रीयस्तरावर सुसंवाद आणि संपर्क ठेवावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सर्व्हेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्रे व जीपीएस कोऑडीनेटद्वारे पिक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. (Maharashtra Drought)
उपाययोजना व सवलती लागू
दुष्काळग्रस्त भागात उपाययोजना व सवलती लागू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज खंडीत केली जाणार नाही, शेतीवर अवलंबून शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा, टंवाई होणार नाही, याबाबत व्यवस्था उभी करणे, जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरु करणे, अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे या उपाययोजनांचा समावेश आहे. (Maharashtra Drought)
महसूल विभागांतील तालुके
ठाणे – १२
नाशिक – ४९
पुणे – ३५
छत्रपती संभाजीनगर – ७४
अमरावती – ५६
नागपूर – ३९





