Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरसह ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त करताना श्रद्धांजली वाहिली.

Ajit Pawar Death tributes from Sachin Tendulkar : महाराष्ट्र राजकारणातील एक दिग्गज नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे एका निवडणूक सभेसाठी जात असताना त्यांचे खाजगी विमान कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील दोन सहकारी आणि दोन क्रू मेंबर्स अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरला असून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी कशी घडली दुर्घटना?
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करण्यासाठी निघाले होते. त्यांचे खाजगी विमान ‘VT-SSK’ सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, लँडिंगच्या काही मिनिटे आधीच विमानाला अपघात झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि स्थानिक प्रशासनाने या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
सचिन तेंडुलकरसह क्रीडा विश्वातून श्रद्धांजली –
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने लिहिले, “अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.”
अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽Very sad to learn about the untimely demise of…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 28, 2026
अजिंक्य रहाणे: “उपमुख्यमंत्री अजित पवार दादांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. महाराष्ट्र राज्यासाठी हे मोठे नुकसान आहे.”
Saddened by the tragic passing of Maharashtra Deputy CM Ajit Pawar dada. My thoughts are with his family. 🙏
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 28, 2026
मोहम्मद अझरुद्दीन: “विमान अपघाताच्या बातमीने मी स्तब्ध झालो आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
Deeply shaken by the news of Mr. Ajit Pawar’s plane crash. I extend my heartfelt condolences to his family and loved ones. May his soul rest in eternal peace, and may his family find the strength and courage to endure this profound loss.
— Mohammed Azharuddin (@azharflicks) January 28, 2026
युसूफ पठाण: “राज्याच्या विकासातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. ते एक प्रामाणिक आणि समर्पित लोकनेते होते.”
Deeply saddened by the untimely demise of the Hon’ble Deputy Chief Minister of Maharashtra, Mr Ajit Pawar in the tragic plane crash. He was a dedicated leader who served the state with utmost commitment and integrity. His contributions to public service and the development of the…
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) January 28, 2026
हेही वाचा – Joe Root Record : जो रूटने मोडला रोहित शर्माचा ‘तो’ रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला चौथा फलंदाज
एक पर्वाचा अंत –
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, अनेक नेत्यांनी त्यांचे बारामती आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदान अधोरेखित केले आहे.





