Vijay Hazare Trophy 2024-25 : सिद्धेश वीरची अष्टपैलू कामगिरी, महाराष्ट्राचा मेघालयावर सहज विजय…

Vijay Hazare Trophy 2024-25 (MAH vs MEG) :- महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरने केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने मेघालयला 9 गडी राखून पराभूत करताना विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
Hat-trick of wins! 🏏🔥
Maharashtra continues their stellar run in the Vijay Hazare Trophy with a dominating 9-wicket victory over Meghalaya! 💪🎯 Top-notch performances from both the bowling and batting departments. 🙌🔝 Proud moment as we lead the table in Group B! 🏆💛… pic.twitter.com/oTb4bWVO2h
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) December 26, 2024
मेघालय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मेघालय संघाचा डाव सिद्धेश वीरच्या गोलंदाजीसमोर 37.1 षटकांत 113 धावांमध्ये संपुष्टात आला. मेघालय संघाकडून अर्पित सुभाषने 34 धावांची खेळी केली, जी मेघालय संघाकडून सर्वाधिक ठरली.
अर्पितला आकाशकुमारने 23, एल. किशनने 16, रॉबर्ट संगमाने 11 धावा करताना साथ देण्याचा प्रयत्न केला. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीरने 3, सत्यजित बच्छाव व रजनीश गुरबानी यांनी प्रत्येकी 2 तर राजवर्धन हंगरगेकरने 1 गडी बाद केला.
महाराष्ट्राने केवळ 19.2 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात 115 धावा करताना विजयावर शिक्कामोर्तब केले. सलामीवीर ओम भोसले व सिद्धेश वीर यांनी 16.5 षटकांत 97 धावांची सलामी दिली. ओम भोसलेने 45 चेंडूत 46 धावांची खेळी करताना 3 चौकार व 1 षटकार मारला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी व सिद्धेश वीर यांनी उर्वरित धावा करताना विजय साकारला. सिद्धेश वीरने 66 चेंडूत 8 चौकारांसह 57 धावांची नाबाद खेळी केली. राहुल त्रिपाठीने 6 चेंडूत 7 धावा केल्या. आदर्श जोशीने 1 गडी बाद केला.





