राज ठाकरेंचा कोकण दौरा चर्चेत.! भेटायला आली खास मैत्रीण, जुन्या आठवणींना दिला उजाळा….

मुंबई – मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे सध्या दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते चिपळूणमध्ये आहेत. त्यानंतर ते खेड आणि दापोलीला भेट देणार आहेत. या कोकण दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू केले आहे.
आज सकाळी त्यांनी चिपळूण येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी राज ठाकरेंनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी सद्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. मात्र, या दौऱ्यावेळी राज ठाकरे एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी चिपळूणला गेले होते, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.
आज सकाळी राज ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात त्यांना भेटण्यासाठी त्यांची शालेय मैत्रीण आली होती. सुष्मिता वायकुळ (विखारे) असे तिचे नाव आहे. राज ठाकरे आणि सुष्मिता यांनी दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले आहे. दादरमधील शाळेत त्यांचे शिक्षण झाले.
यावेळी सुष्मिता यांनी राज ठाकरेंना आपल्या नवऱ्याची ओळख देखील करून दिली. सुष्मिता यांचे चिपळूणमध्ये सासर आहे. या भेटीत शालेय मैत्र-मैत्रीणीच्या गप्पा काही वेळ रंगल्या होत्या. राज ठाकरे यांच्याशी संवाद साधताना जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.






