Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न; पाहा संपूर्ण यादी एका Click वर

Updated On:

Maharashtra Cabinet Expansion । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19, शिवसेना (शिंदे गट) 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (शपथविधी सोहळा) पार पडला.

महायुती मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला, भाजपने विधानसभेत तब्बल 132 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 आणि शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आज मंत्रिमंडळ (33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपद) विस्तार पार पडला आहे.

भाजपच्या 19 मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे

चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर , मेघना बोर्डीकर , शिवेंद्रसिंहराजे भोसले,जयकुमार गोरे.

शिवसेनेच्या 11 मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे

गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशीष जैस्वाल (राज्यमंत्री), योगेश कदम(राज्यमंत्री)

राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे

हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक

दरम्यान, महाराष्ट्रात तीन दशकांनंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी मुंबईऐवजी नागपुरात झाला. महाराष्ट्रात यापूर्वी 1991 मध्ये नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता म्हणजे 2024 ला शपथविधी पार पडला.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...