Education News : देशातील 32 बनावट विद्यापीठांची UGC कडून यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ दोन संस्थांचाही समावेश
Education News : UGC ने देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३२ बनावट विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील दोन संस्थांसह संपूर्ण यादी पाहा. प्रवेशापूर्वी मान्यता तपासा.

Education News : उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ निवडताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सावध राहण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) केले आहे. आयोगाच्या अधिकृत यादीत देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३२ बनावट विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. (Education News)
यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी आणि सोलापूर जिल्ह्यातील नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ या दोन संस्थांचा समावेश आहे.
UGC ने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक सूचना जारी केली. सर्वोच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी तिची मान्यता आणि पदवी देण्याचा कायदेशीर अधिकार तपासावा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
कोणत्या राज्यात किती बनावट विद्यापीठे? (Education News )
UGC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली यादी फेब्रुवारी २०२६ पर्यंत अद्ययावत असल्याचे नमूद आहे. या यादीतील ३२ संस्थांची राज्यनिहाय नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. आंध्र प्रदेश (२ संस्था)
1. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी
2. बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया
२. अरुणाचल प्रदेश (१ संस्था)
3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन
३. दिल्ली (१२ संस्था)
4. माउंटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी
5. वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
6. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग
7. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन
8. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस
9. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड
10. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
11. व्होकेशनल युनिव्हर्सिटी
12. एडीआर-सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी
13. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग
14. विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट
15. आध्यात्मिक विश्वविद्यालय (स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी)
४. हरियाणा (१ संस्था)
16. मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी
५. झारखंड (१ संस्था)
17. दक्ष युनिव्हर्सिटी (व्होकेशनल अँड लाइफ स्किल एज्युकेशन)
६. कर्नाटक (२ संस्था)
18. ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी
19. सर्व भारतीय शिक्षा पीठ
७. केरळ (२ संस्था)
20. इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ प्रोफेटिक मेडिसिन
21. सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी
८. महाराष्ट्र (२ संस्था)
22. राजा अरेबिक युनिव्हर्सिटी – नागपूर
23. नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ – ताडवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
९. पुद्दुचेरी (२ संस्था)
24. उषा लछुमनन कॉलेज ऑफ एज्युकेशन
25. श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन
१०. राजस्थान (१ संस्था)
26. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट
११. उत्तर प्रदेश (४ संस्था)
27. गांधी हिंदी विद्यापीठ
28. नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी (ओपन युनिव्हर्सिटी)
29. भारतीय शिक्षा परिषद
30. महामाया टेक्निकल युनिव्हर्सिटी
१२. पश्चिम बंगाल (२ संस्था)
31. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन
32. इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च
UGC ने विद्यार्थ्यांना कोणता इशारा दिला? (Education News)
विद्यापीठाचे नाव आकर्षक आहे किंवा त्याची वेबसाइट चांगली आहे, म्हणून ते अधिकृत असल्याचे समजू नये, असे UGC ने स्पष्ट केले आहे. संस्थेची कायदेशीर मान्यता, पदवी देण्याचा अधिकार आणि संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक परवानग्या तपासणे गरजेचे आहे.
काही संस्था जाहिराती, पुस्तिका आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मान्यतेचे दावे करतात. मात्र, केवळ अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये. प्रवेश घेण्यापूर्वी अधिकृत सरकारी नोंदी तपासाव्यात, असे आयोगाने सांगितले आहे.
प्रवेश घेण्यापूर्वी या पाच गोष्टी तपासा (Education News)
1. UGC मान्यता : संबंधित विद्यापीठाला कायदेशीर मान्यता आहे का, हे तपासा.
2. पदवी देण्याचा अधिकार : संबंधित संस्थेला जाहिरात केलेली पदवी देण्याची परवानगी आहे का, हे पाहा.
3. अभ्यासक्रमाची मान्यता : अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या संबंधित नियामक संस्थांची मंजुरी तपासा.
4. ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण : ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणातून अभ्यासक्रम करण्यासाठी संबंधित विद्यापीठ आणि अभ्यासक्रमाला त्या शैक्षणिक सत्रासाठी परवानगी आहे का, हे तपासा.
5. फी भरण्यापूर्वी खात्री : प्रवेश शुल्क किंवा इतर पैसे भरण्याआधी सर्व कागदपत्रे आणि मान्यता तपासा.
बनावट विद्यापीठातून शिक्षण घेतल्यास काय नुकसान होऊ शकते?
मान्यताप्राप्त पदवी देण्याचा अधिकार नसलेल्या संस्थेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची पदवी पुढील शिक्षणासाठी किंवा सरकारी नोकरीसाठी ग्राह्य धरली जाईलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि प्रवेशासाठी खर्च केलेले पैसे वाया जाण्याचा धोका असतो.
त्यामुळे केवळ जाहिरातींवर विश्वास ठेवून प्रवेश घेऊ नये. विद्यापीठाची मान्यता आणि अभ्यासक्रमाची वैधता स्वतंत्रपणे तपासावी.





