Cabinet Expansion : मोठी बातमी! फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ मंत्र्यांचा पत्ता कट? नव्या चेहऱ्यांना संधी?
Cabinet Expansion : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या आणि विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच, आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे.

Cabinet Expansion : महायुती सरकारमध्ये मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि मोठा खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Cabinet Expansion)
सुमार कामगिरी करणारे तसेच वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या काही मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. (Cabinet Expansion)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. (Cabinet Expansion)
अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या तसेच सतत वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा पर्याय गंभीरपणे विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. (Cabinet Expansion)
यापूर्वी काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे महायुती सरकारला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी संबंधित मंत्र्यांना वरिष्ठ नेत्यांकडून समज देण्यात आली होती. मात्र, आता आगामी विस्तारात अशा मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. (Cabinet Expansion)
याशिवाय, काही प्रभावी मंत्र्यांकडील खात्यांमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो, तर शिवसेनेच्या कोट्यातील काही मंत्र्यांच्या भवितव्याबाबतही उत्सुकता वाढली आहे. (Cabinet Expansion)
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार? बड्या राजकीय नेत्याच्या दाव्याने खळबळ






