Maharashtra Election: साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मंगळवारी (दि. 29) साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. नाना पटोले यांची थेट लढत भाजप उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांच्याशी होणार आहे.
Maharashtra Congress President Nana Patole files his nomination from Sakoli Assembly constituency, for #MaharashtraElection2024
(Pic: Maharashtra Congress) pic.twitter.com/ZguzWibs5D
— ANI (@ANI) October 29, 2024
अविनाश ब्राम्हणकर हे राष्ट्रवादी काँग्रसेचे भंडारा जिल्हा परिषदेचे गटनेते होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. एक कुणबी चेहरा म्हणून अविनाश ब्राम्हणकर यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे आव्हान असून यात कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
साकोली मतदारसंघ 2019 निवडणूक –
साकोली विधानसभा मतदारसंघ हा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असून तो भंडारा जिल्ह्यात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेसचे नाना पटोले यांनी 95208 मते मिळवून विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे डाॅ. परिणय फुके होते.





