Pune Cantonment Assembly constituency: विधानसभेत सर्वसामान्यांचा आवाज म्हणूनच जाणार – आमदार सुनील कांबळे

पुणे : मागील पाच वर्षात करोना काळासह सातत्याने कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील नागरिकांना विविध सोई, सुविधा उपलब्ध करुन देत असतानाच राज्यातील कष्टकरी, दुर्बल घटकातील नागरिक, विद्यार्थी, कामगार यांच्या न्याय मागण्यांबाबत विधानसभेत आवाज उठवता आला या कामाची पावती म्हणूनच पक्षाकडून आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. तर, पुढील पाच वर्षात पुन्हा एकदा आपण सर्वसामान्यांचा आवाज म्हणूनच विधानसभेत भूमिका मांडणार असल्याची ग्वाही भाजपचे महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांनी मतदारांना दिली. कांबळे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भवनीपेठ, काशेवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कांबळे यांनी भागातील मतदारांशी संवाद साधला.
माजी नगरसेविका अर्चना पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, तुषार पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती आदी संघटना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील सहभागी झाले होते.
“काशेवाडी भागातच आपला बराच कालावधी गेल्याने या भागात असलेल्या समस्यांची मला कल्पना आहे. वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले त्यात आम्हाला यश आले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी सोडविण्यास आमचा पुढील काळात प्राधान्यक्रम असणार आहे.” – सुनील कांबळे ( महायुती उमेदवार )





