Pune Cantonment Assembly constituency: कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी मला साथ द्या; रमेश बागवे यांचे मतदारांना साकडे

पुणे – विकासासाठी दूरदृष्टी, विकासाचा ध्यास, नेतृत्व अशी क्षमता असलेला नेता आवश्यक आहे. या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे. या भागाचा विकास होणार असल्याने जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काॅग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी मतदारांना केले.
तसेच महायुतीचे सरकार हे कँटोन्मेंटच्या विकासातील अडसर असल्याची टिकाही यावेळी केली. बागवे यांच्या जाहीर प्रचाराचा नारळ बुधवारी फोडण्यात आला. प्रभाग क्रमांक १७ मधील संत कबीर चौक ते पॉवर हाउस आणि सायंकाळी प्रभाग क्र २८ मधील सॅलेसबरी पार्क येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा पॉवर हाउस येथे दुपारी दोन वाजता समारोप झाला.
रवींद्र माळवदकर, सुनील पडवळ, राजेंद्र पडवळ, लता राजगुरू, विशाल धनवडे, प्रा. वाल्मिकी जगताप, संगीता तिवारी, रमेश अय्यर, जयंत किराड, रामभाऊ पारीख, भाई कात्रे, डॉ. वैष्णवी किराड, विजय शिंदे, शीला रतनगिरी, सुनील घाडगे, विजय वारभवन, फय्याज शेख, सुनील गवते, राजेश मोरे, शेखर जावळे, दत्ताभाऊ जाधव, उत्तम भुजबळ, उमेश शेडगे, माउली जाधव, अशोक लांडगे, अॅड. श्रीकांत अगस्ते, राजू अरोरा, सुनील दैठणकर, भोलासिंग अरोरा, मीनाताई पवार यांच्यासह विजय नायर, मधु नायर व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वेगवेगळ्या भागात मतदारांनी बागवे यांचे स्वागत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा दिल्या.




