Pune District | विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये महापूजा

सासवड,- खळद (ता. पुरंदर) येथे कार्तिक एकादशीच्या निमित्ताने येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये पहाटे शिवाजी जगन्नाथ कामथे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रखुमाईंची शोडोषोफचार अभिषेक, महापूजा पार पडली. यावेळी ग्रामपुरोहित अजितकाका खळदकर व पुजारी हभप नयन महाराज गुरव यांनी या विधीचे पौराहित्य केले.
यावेळी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करत बळीराजाला सुखाचे दिवस येण्याची प्रार्थना करण्यात आली. वर्षभर नित्य नियमाने एकादशीच्या निमित्ताने महापूजा होत असते. याच परंपरेतून ही महापूजा करण्यात आली. यावेळी शिवाजी कामथे, मनीषा कामथे, हभप साहेबराव कामथे, नाना महाराज खळदकर, अंकुश कामथे, आत्माराम कुंभार, बाळासाहेब कामथे, चंद्रकांत कामथे, दशरथ कादबाने, सुरेश रासकर, रवींद्र कामथे, रवींद्र फुले, हरीभाऊ फुले, भैरवनाथ कामथे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
आळंदी येथे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते, याच परंपरेतून खळद येथेही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सकाळी महापूजा तर सायंकाळी रात्री विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ यांच्या वतीने हरिजागर करण्यात आला.





