महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू, 19 जखमी; उत्तर प्रदेश सरकारचे पहिले अधिकृत विधान

Mahakumbh Mela Stampede UP Government Official Statement: मौनी अमावस्येला आज सकाळी झालेल्या महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेश सरकारचे पहिले अधिकृत विधान आले आहे. पोलिस डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 19 जखमी रुग्णालयात दाखल आहेत.
ते म्हणाले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 25 लोकांची ओळख पटली आहे, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांतील लोकांचा मृत्यूच्या संख्येत समावेश आहे. अपघातानंतर एकूण 90 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी सध्या गंभीर जखमी असलेले 19 जण दाखल आहेत, उर्वरित सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Prayagraj, UP: 30 people have lost their lives in the Maha Kumbh stampede that took place between 1-2 AM. 25 people have been identified and the identification of the remaining 5 is being done: DIG Mahakumbh, Vaibhav Krishna pic.twitter.com/9CqHORT0wt
— ANI (@ANI) January 29, 2025
पोलिस डीआयजीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी पहाटे दीड वाजता घाटावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले. तर ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करण्यासाठी गर्दीत स्पर्धा लागली आणि लोकांनी बॅरिकेड तोडून इकडे तिकडे धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, घाटाच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांना चिरडून लोक पुढे सरकू लागले.
#WATCH | Prayagraj, UP: DIG Mahakumbh, Vaibhav Krishna says “Before Brahma Muhurta, between 1 am to 2 am, a huge crowd gathered on the Akhara Marg. Due to this crowd, the barricades on the other side broke and the crowd ran over the devotees waiting to take a holy dip of Brahma… pic.twitter.com/ZL6KlmMf9k
— ANI (@ANI) January 29, 2025
पोलिसांनी सांगितले की, सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. आज संध्याकाळपर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी अमृत स्नान केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 13 जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 25 कोटी लोकांनी महाकुंभात श्रद्धेने स्नान केले आहे.



