महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, शाही स्नान थांबवण्याचा निर्णय

Mahakumbh Mela Stampede: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमावर शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. गर्दी एवढी प्रचंड वाढली की त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. मौनी अमावस्येसाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री अंघोळ सुरू झाल्यानंतर संगमावर गर्दी वाढली. रात्री 2 वाजताच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सांगितले जाते. गर्दी एवढी प्रचंड वाढली की अनेक ठिकाणी बॅरिकेड्सही तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
#WATCH | प्रयागराज, उत्तर प्रदेश: महाकुंभ में भगदड़ जैसी स्थिति उत्पन्न होने के बाद बचाव अभियान जारी है। घटना में कई लोगों के घायल होने की खबर है। https://t.co/mODauGh8iX pic.twitter.com/j8RlgkKztw
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2025
महाकुंभचे अधिकारी विजय किरण आनंद यांनी सांगितले की, अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 17 भाविकांचा मृत्यू झाला. 50 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. जखमींना महाकुंभ नगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर अमृत स्नानचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांमध्ये परत बोलावल्या आहेत. आखाड्यांचे अमृत स्नान सध्या तरी थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधत महाकुंभमेळ्याच्या परिस्थितीबद्दल आढावा घेतला आहे. तसेच, तातडीने भाविकांसाठी उपाययोजना करण्यास सांगितले.





