महाबळेश्वर नगरपालिका शहर सौंदर्यीकरणात राज्यात दुसरी; मिळाले १० कोटींचे बक्षीस

पाचगणी : महाबळेश्वर शहराच्या इतिहासात मानाचा तुरा म्हणुन महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शहर सौंदर्य करण स्पर्धा 2022 अंतर्गत आयोजित राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेस राज्यस्तरीय दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. महाबळेश्वर शहराच्या मुख्याअधिकारी यांची कामगिरी याच फलीत म्हणुन हा पुरस्कार मिळाल असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नगर विकास दिनाचे औचित्य साधुन मुंबई मंत्रालयात हा सोहळा पार पडला. तसेच, महाबळेश्वर नगरपालीकेला मिळालेला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमकांकरिता 10 कोटी रुपायचे रोख बक्षिस मुख्याअधिकारी पल्लवी पाटील यांनी मुंबई येथे स्विकारले आहे.
महाबळेश्वर शहराला निसर्गाच विलोभनीय वरदान लाभले आहे. पर्यावरण दृष्ट्यासंवेदनशील म्हणुन ओळख असणारे महाबळेश्वर शहर स्वच्छ ठेवण्याकरीता सदैव अग्रेसर भुमीका पल्लवी पाटील यांनी आजपर्यंत निभावली आहे. कचऱ्याचा पर्यावरणावर विपरीत परीणाम न होता स्वच्छ शहराच्या मुलभुत गरजेकरीता सर्वसामान्स जनतेमध्ये जागरुकता निर्माण करुन स्वच्छतेची चळवळ निर्माण करुन कचऱ्याचे कमीत कमी प्रमाणात निर्मीती करण्याच महत्वाच काम पल्लवी पाटील यांनी गत दोन वर्षापासुन सदैव चालु ठेवले आहे.
दरम्यान, जागतीक पर्यटनस्थळ म्हणुन नावलौकीक असलेल्या महाबळेश्वर शहरात पर्यावरणाला बाधक प्लास्टीकचे देखील उच्चटन करत प्लास्टीकचा वापर कमी करण्यावर व पर्यावरण समृद्ध ठेवण्याकरीताचा कृतीपुर्ण आरखडा पल्लवी पाटील यांनी अबलंब केल्यामुळे महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालीकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस प्राप्त झाल्याचं बोललं जात आहे.
शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला सदराचे यश प्राप्त करता आले. राहुल नार्वेकर यांचे हस्ते व दीपक केसरकर, मनुकुमार श्रीवास्तव, भूषण गगराणी आणि सोनिया सेठी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.





