Pune District : झेडपीच्या निवडणुका महायुती जिंकेल

शिक्रापूर : गेल्या काही वर्षात महायुती सरकारने जलदगतीने कामे करीत अडीच वर्षात विकासाचे अनेक निर्णय घेतल्याने जनतेने इतिहासात प्रथमच महायुतीला भरघोस यश दिले असल्याने आता पुढील काळात महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्क्याने जिंकेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई देवीच्या पटनाम सोहळ्यावेळी देवीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले असताना बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, सरपंच राजश्री रुपनेर, उपसरपंच योगेश पुंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामराव सासवडे, पोपट धोत्रे, बापू शिंदे, बबन शिंदे, सोपान जाधव उपस्थित होते.
यावेळी मेसाई देवीच्या दर्शनासाठी बऱ्याच वर्षाने आलो आलो आहे. अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी मला मिळाल्या आहेत. सर्वसामान्य लोकांच्या व्यथा समजल्या आहेत. सध्या कान्हूर मेसाई गावात बदल झाला आहे. लाडक्या बहिणी मला भेटल्याचे सांगत मराठी भाषेला अभिजात भाषेचा निर्णय झाल्यानंतर आजच त्याबाबत शासन निर्णय निघाला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने मोठा कौल दिला. त्यामुळे आम्ही जोमाने काम करतोय. आमची जबाबदारी वाढली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, लवकरच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री पदांची नेमणूक करुन प्रत्येक जिल्ह्याला न्याय दिला जाईल.
बारा गावांचा अहवाल पाठवा
शिंदे म्हणाले की, शिरुर तालुक्यातील बारा गावांच्या पाणी प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी व संबधित विभागांशी बोलतो. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना याबाबतचा अहवाल बनवून पाठवण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी दिल्या. तर





