Thalapathy Vijay : थलपती विजय यांना मोठा धक्का; ‘या’ निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती
Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या राजकीय रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Thalapathy Vijay : तामिळनाडूतील चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Thalapathy Vijay)
मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या नियुक्त्यांबाबतही न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्याची माहिती आहे. (Thalapathy Vijay)
माहितीनुसार, 27 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पीडित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. (Thalapathy Vijay)
मात्र, आता या निर्णयावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Thalapathy Vijay)





