Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवस : पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शूर सैनिकांच्या शौर्याचे स्मरण
Kargil Vijay Diwas: १९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय लष्कराच्या ऐतिहासिक विजयाचे आणि त्यांच्या शूर सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

Kargil Vijay Diwas: १९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय लष्कराच्या ऐतिहासिक विजयाचे आणि त्यांच्या शूर सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत सर्वांनी शूर सैनिकांच्या शौर्याचे स्मरण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत, “कारगिल विजय दिनानिमित्त, भारताच्या सुरक्षेसाठी आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेल्या असाधारण शौर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आपले राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करते.”असे म्हटले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांचे अदम्य धैर्य हे नेहमीच राष्ट्रीय अभिमानाचे स्रोत राहील. त्यांची अढळ देशभक्ती आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. Kargil Vijay Diwas:
अमित शाह यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, “कारगिल विजय दिवस हा भारतीय लष्कराच्या अदम्य शौर्याचे आणि असाधारण पराक्रमाचे प्रतीक आहे.
On Kargil Vijay Diwas, our nation expresses gratitude to the brave soldiers for their extraordinary courage and commitment towards securing India. Their valour in the face of the most formidable conditions will forever remain a source of national pride. Their unwavering…
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
१९९९ मध्ये, हिमालयाच्या खडबडीत बर्फाच्छादित शिखरांवरील प्रतिकूल परिस्थिती आणि शत्रूच्या उंच ठिकाणांना तोंड देत, आपल्या शूर सैनिकांनी ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून शत्रूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.”
ते पुढे म्हणाले, “कारगिल विजय दिनानिमित्त, मी राष्ट्राची अखंडता टिकवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या त्या सर्व शूर सुपुत्रांचे स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो.”
राजनाथ सिंह काय म्हणाले? Kargil Vijay Diwas:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व शूर सैनिकांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
१९९९ मध्ये कारगिलच्या दुर्गम शिखरांवर असाधारण शौर्य दाखवणाऱ्या सर्व शूर सैनिकांचे राष्ट्र सदैव आभारी आणि ऋणी राहील. भारतीय लष्कराचे अदम्य धैर्य, त्याग आणि अढळ निर्धार भावी पिढ्यांना देशभक्ती, समर्पण आणि मातृभूमीप्रती निष्ठा अंगीकारण्यासाठी प्रेरणा देत राहील.”
राजनाथ सिंह म्हणाले, “कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला द्रास येथे आयोजित शौर्य संध्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. कारगिल विजयाचे स्मरण आपल्याला अभिमान देत असले तरी, आपल्यासमोरील आव्हाने किंचितही कमी झालेली नाहीत हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय संरक्षण दल कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.”
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि संरक्षण आधुनिकीकरणावर सातत्याने भर दिला जात आहे, जेणेकरून लष्कराला जागतिक दर्जाची शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळू शकेल.





