CM Vijay : विजय यांच्या निवडीला आव्हान; निवडणूक याचिका दाखल
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय (CM Vijay) यांच्या आमदार म्हणून निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्याविषयीची निवडणूक याचिका द्रमुकचे पराभूत उमेदवार आर.डी.शेखर यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तमिळनाडूत नुकतीच विधानसभा निवडणूक झाली.

CM Vijay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय (CM Vijay) यांच्या आमदार म्हणून निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्याविषयीची निवडणूक याचिका द्रमुकचे पराभूत उमेदवार आर.डी.शेखर यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तमिळनाडूत नुकतीच विधानसभा निवडणूक झाली.
त्यावेळी टीव्हीकेचे संस्थापक विजय (CM Vijay) यांनी पेरम्बूर विधानसभा मतदारसंघात बाजी मारली. त्यांनी शेखर यांना ५३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत केले. विजय यांना १ लाख २० हजार ३६५, तर शेखर यांना ६६ हजार ६५० मतं मिळाली. आता शेखर यांनी विविध कारणांवरून विजय यांच्या निवडणूक विजयाला आव्हान दिले आहे.
निवडणूक आयोगाने मनाई केलेली असतानाही विजय यांनी प्रचारासाठी बालकांचा वापर केल्याचा आरोप शेखर यांनी केला आहे. विजय (CM Vijay) यांनी उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात काही विसंगती आहेत.
त्यांनी प्राप्तिकर थकबाकीची आणि सोशल मीडियावरील प्रचारखर्चाची माहिती नमूद केली नाही, असे दावेही निवडणूक याचिकेतून करण्यात आले आहेत. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने विजय यांना नोटीस बजावून उत्तर मागवले. संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल.






