उपराष्ट्रपती पदासाठी मध्य प्रदेशमधील नेत्याचे नाव आघाडीवर; जातीय समीकरणांतही फिट

Thawarchand Gehlot | उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आयोगाने यासाठी राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच दोन सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आता या पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती केली जाईल का, असा प्रश्न सर्वाधिक चर्चेत आहे. आजवर या पदावर एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही.
निवडणूक आयोगाने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम १९७४ अंतर्गत या नियुक्त्या केल्या आहेत आणि पुढील काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर केला जाईल. आयोगाच्या मते, या निवडणुका आयोजित करण्याची जबाबदारी लोकसभा आणि राज्यसभेच्या सरचिटणीसांना आलटून पालटून देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत लोकसभा सरचिटणीसांनी ही भूमिका बजावली होती. त्यामुळे यावेळी संपूर्ण प्रक्रिया राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली जाईल. Thawarchand Gehlot |
भाजपमध्ये उपराष्ट्रपपती पदासाठी उमेदवार निश्चित करण्याबाबत विचारमंथन सुरू आहे.मित्रपक्षांचे मत आहे की यावेळी पक्ष कोणत्याही प्रयोगापेक्षा संघटनात्मक ताकद आणि वैचारिक शुद्धतेवर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच धनखड यांच्यासारख्या इतर पक्षांच्या नेत्याऐवजी ते भाजपच्याच अनुभवी नेत्याची निवड करण्यावर लक्ष केंद्रित करेल. जेडीयू खासदार हरिवंश यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या जवळपास सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सत्ताधारी पक्षाचा विश्वास संपादन केला आहे. Thawarchand Gehlot |
नितीश कुमार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत
या पदाच्या उमेदवारीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, भाजप नेते रविशंकर प्रसाद यांची नावेही समोर येत आहेत. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून जेडीयूला ही ऑफर दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.
थावरचंद गेहलोत एक महत्त्वाचे नाव
थावरचंद गेहलोत हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दलित समाजातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. ते मध्य प्रदेशातून अनेक वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. ते राज्यसभेत सभागृहाचे नेते आणि भाजप संसदीय मंडळाचे सदस्यही राहिले आहेत.
गेहलोत यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. गेहलोत हे वादांपासून दूर राहणारे नेते मानले जातात. संघटनेत मजबूत पकड, प्रशासकीय अनुभव तसेच जातीच्या समीकरणात बसणे यामुळे ते उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य दावेदार बनले आहेत. Thawarchand Gehlot |
हेही वाचा :




