मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; शहीद जवानाच्या आई-वडील आणि पत्नीला मिळणार 50-50 टक्के रक्कम

MP News| मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कोणताही जवान शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रक्कम दिली जाणार असून त्यातील 50 टक्के रक्कम ही त्याच्या पत्नीला आणि 50 टक्के रक्कम पालकांना देण्यात येईल, असा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सांगितले आहे. सीएम मोहन यांनी शुक्रवारी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.
याबाबत सीएम मोहन यांनी सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सीएम मोहन यांनी म्हटले आहे की, “आम्ही निर्णय घेतला आहे की राज्यातील कोणत्याही जवान शहीद झाल्यास 50 टक्के रक्कम पत्नीला आणि 50 टक्के रक्कम पालकांना दिली जाईल.”
हमने तय किया है कि प्रदेश के किसी भी जवान के शहीद होने पर दी जाने वाली राशि में 50 प्रतिशत पत्नी को और 50 प्रतिशत माता-पिता को दी जाएगी : CM@DrMohanYadav51#DrMohanYadav #CMMadhyaPradesh pic.twitter.com/im4PddQAbu
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) July 18, 2024
यासोबतच सीएम मोहन यांनी मध्य प्रदेशमध्ये 7 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही भरती वर्षभरात केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. MP News|
पोलिसांसाठी 25 हजार घरे
यासोबतच मध्यप्रदेशातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 25 हजार घरे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाची मदत आणि राहण्याच्या अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यासोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बँडचीही व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सीएम मोहन यांनी दिली आहे.
दरम्यान, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या सुनेने त्यांना काहीही दिले नाही आणि सून घर सोडून गेली, असा आरोप केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
हेही वाचा:





