BJP Leader : भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे निधन! पक्षाचा अनुभवी चेहरा हरपला, राजकीय वर्तुळात शोककळा
BJP Leader : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे भाचे अजय मिश्रा यांचे वयोमानानुसार आणि आजारपणामुळे ग्वालियर येथे निधन झाले.

BJP Leader : भाजपचे ज्येष्ठ नेते अजय मिश्रा यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने पक्षात तसेच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांनी ग्वालियर येथे अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अजय मिश्रा हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाचे होते, तसेच मध्यप्रदेशचे माजी मंत्री अनुप मिश्रा यांचे धाकटे बंधू होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
प्रकृती खालावल्याने त्यांना ग्वालियरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनास त्रास व इतर आरोग्य समस्यांवर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली. अंतिम संस्काराची तयारी सुरू असून, अनेक नेते व पदाधिकारी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहत आहेत.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनी अजय मिश्रा यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले. विविध नेत्यांनी सोशल मीडियावरूनही त्यांच्या कार्याची आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




