Madhuri Elephant : नांदणी मठात परतणार ‘माधुरी’ हत्तीण; ४०९ दिवसांनंतर ‘वनतारा’तून सुटका
Madhuri Elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (ता. शिरोळ) येथील जैन मठाची आणि भाविकांची लाडकी 'माधुरी' हत्तीण तब्बल ४०९ दिवसांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नांदणी मठात परतणार आहे.

Madhuri Elephant : तब्बल ४०९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार आहे. गुजरातमधील वनतारा केंद्रात असलेल्या माधुरीला नांदणी मठात परत आणण्यास उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर तिच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. (Madhuri Elephant)
माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी गेल्या वर्षभरापासून नांदणी मठ आणि राज्य सरकारच्या पातळीवर कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेत वनतारा आणि उच्चस्तरीय समितीने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. (Madhuri Elephant)
माधुरीला मठात परत पाठवताना तिच्या आरोग्याबाबत उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. माधुरीच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश देण्यात आले असून, तिच्या निवासस्थानासह आवश्यक सोयी-सुविधांबाबतही मठाला सूचना करण्यात आल्या आहेत. (Madhuri Elephant)

मठ प्रशासनाकडून समितीला या सर्व सूचनांचे पालन करण्याचे तसेच वन्यजीव कायद्यानुसार आवश्यक त्या सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. (Madhuri Elephant)
Madhuri Elephant : नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; कोर्टाकडून मिळाली परवानगी
Madhuri Elephant | माधुरी हत्तीण परत येणार? कोल्हापुरकरांना मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द





