माधुरी दीक्षितला हॉरर चित्रपटांचे वेड

बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर प्रेक्षक ‘भूल भुलैया 3’चे कौतुकही करत आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.
‘भूल भुलैया 3’ अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितले की, तिला हॉरर चित्रपटांचे वेड आहे. IANS शी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली की ती ‘भूल भुलैया 3’ मधून भयपट भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यास तयार आहे. ती खूप एन्जॉय करत आहे कारण ती पूर्वीपेक्षा काहीतरी वेगळं करत आहे. खूप छान वाटतं कारण मला काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते.
माधुरी दीक्षितला हॉरर चित्रपटांचे वेड
यासोबतच माधुरी दीक्षित पुढे म्हणाली, ‘मी जास्त हॉरर चित्रपट पाहत नाही, मला भीती वाटते, पण मला या चित्रपटांचे वेड लागले आहे, मला वाटते की ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीही केली नव्हती. माधुरी दीक्षितने ‘भूल भुलैया 3′ मध्ये विद्या बालनसोबत केलेल्या तिच्या डान्सबद्दलही बोलले. ती म्हणाली जोपर्यंत प्रेक्षकांना ते आवडते तोपर्यंत ठीक आहे आणि त्यामुळे चित्रपटाची उत्सुकताही वाढते.’
33 वर्षांपूर्वी सायको-थ्रिलर चित्रपट बनवला होता. याआधी माधुरी दीक्षित 1991 मध्ये ‘100 डेज’ या सायको-थ्रिलर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही अनेक भीतीदायक दृश्ये होती. ‘भूल भुलैया 3’ मधील तिच्या भूमिकेबद्दल माधुरी दीक्षित म्हणाली, ‘मी ही भूमिका खूप एन्जॉय केली आहे, मला वाटते की लोकांनी मनोरंजनासाठी हा चित्रपट पाहावा.’
=============





