Madhuri Dixit and Anil Kapoor: माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर…
Madhuri Dixit and Anil Kapoor: ऑनक्रीन जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम

Madhuri Dixit and Anil Kapoor: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या ऑनक्रीन जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर आली आहे.
माधुरी दीक्षितचा मां बहन हा सिनेमा नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या सिनेमाचे नुकतेच स्क्रिनिंग झाले. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अनिल कपूरदेखील हजर होते.
View this post on Instagram
यावेळी दोघांनी एकत्र फोटो काढले. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की अनिल कपूर यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर माधुरीने पिवळ्या व निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यांनी एकत्र फोटोंसाठी पोझ दिल्या. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी देखील पुन्हा दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यास आनंद होईल असे कमेंट करत म्हंटले आहे.
माधुरी व अनिल कपूर यांनी पहिल्यांदा तेजाब या सिनेमात एकत्र काम केले होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर दोघांनी लज्जा, परिंदा, हिफाजत, प्रतिकार, राम लखन, टोटल धमाल, दिल तेरा आशिक, बेटा, किशन कन्हैय्या, खेल,जमाई राजा, राजकुमार, जिंदगी एक जुवा, अशा अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे. Madhuri Dixit and Anil Kapoor
हेही वाचा:





