भाजप उमेदवार माधवी लता यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणामुळे एफआयआर दाखल

FIR On Madhavi Latha| हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून के माधवी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र एका एका व्हायरल व्हिडिओनंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माधवी लता यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप ठेवत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी रात्री उशीराने ही माहिती दिली.
नेमकं काय घडलं? FIR On Madhavi Latha|
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपल्या प्रचारफेरीवेळी माधवी लता मिरवणुकीत मशिदीकडे बाण सोडण्याची खूण करताना दिसून आल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या मिरवणुकीत माधवी लता यांनी बाणाचे काल्पनिक चिन्ह काढून ते एका धार्मिक स्थळाकडे वळवले. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की माधवी लता यांच्या विरोधात २० एप्रिल रोजी भारतीय दंड संहिता कलम २९५-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कल श्री राम नवमी के पावन पर्व के उपलक्ष में “भाग्यनगर श्री राम नवमी उत्सव समिति” के द्वारा गोशामहल विधानसभा में आयोजित शोभा यात्रा कार्यक्रम में हिस्सा लिया जिसमे मेरे सभी छोटे और बड़े बहन भाइयों का जोश देखने लायक़ था।
प्रभु श्री राम हम सभी के जीवन को सुख समृद्ध बनायेंगे 🙏 pic.twitter.com/DGvhCwGPUh
— Kompella Madhavi Latha (Modi Ka Parivar) (@Kompella_MLatha) April 18, 2024
व्हायरल व्हिडिओवर माधवी लता यांनी दिले स्पष्टीकरण FIR On Madhavi Latha|
माधवी लता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘माझ्या लक्षात आले आहे की माझ्याविरोधात नकारात्मकता निर्माण करण्यासाठी माझा एक अपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की हा एक अपूर्ण व्हिडिओ आहे आणि अशा व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागू इच्छितो कारण मी सर्व व्यक्तींचा आदर करते.’
एएनआयला दिलेल्या निवेदनात माधवी लता म्हणाल्या की, राम नवमीच्या निमित्ताने आम्ही अयोध्येतील रामलल्लाच्या जन्मसोहळ्याविषयी आनंद साजरा करत होतो. त्यांनी माझा चुकीचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला आहे. कोणीतरी मला सांगितले की मी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत पण मला सांगायचे आहे की त्या क्षणी आमच्या व्हिडीओमध्ये मशिद कुठेही दिसत नाही.
असे असताना इतरांच्या व्हिडीओमध्ये मशिद कशी काय दिसते आहे? मी जर मुस्लिमांच्या विरोधात असते तर मी हजरत अली साहबच्या मिरवणुकीत का सामील झाले असते? मी अनेकांना स्वत:च्या हाताने जेवण दिले आहे. हे लोक मला टार्गेट करत आहेत कारण त्यांना निकालाच्या दिवसाची भीती वाटते.
हेही वाचा:





