Macau Open 2024 (Badminton) : मकाऊ ओपनमध्ये त्रिशा-गायत्रीची विजयी सलामी….

Macau Open Badminton 2024 : त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. भारतीय जोडीने मंगळवारी मकाऊ येथे तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अकारी सातो आणि माया तागुची या जपानी जोडीचा पराभव केला. जवळपास तासभर चाललेल्या पहिल्या फेरीच्या या सामन्यात भारतीय जोडीने 15-21, 21-16, 21-14 असा विजय मिळवत आगेकूच केली.
अन्य लढतींमध्ये एन सिक्की रेड्डी आणि रुत्विका शिवानी यांनी महिला दुहेरी पात्रता उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या ‘चेउंग यान यू’ आणि ‘च्यु विंग ची’ या जोडीचा 21-15, 21-10 असा पराभव केला.
आर्यमन टंडनने पुरुष एकेरीच्या पात्रतेत देशबांधव तरुण मानेपल्लीचा 11-21, 21-15, 21-17 असा पराभव केला, परंतु उपांत्यपूर्व फेरीत दुसरा देशबांधव आलाप मिश्राविरुद्ध त्याला 10-21, 22-24 असा पराभव पत्करावा लागला.





