Macau Open 2024 (Badminton) : भारताच्या त्रिशा-गायत्रीचे आव्हान संपुष्टात…

Macau Open 2024 (Badminton) :– भारताच्या शटलर्स त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद यांना माकाऊ ओपन बँडमिंटन स्पर्धेतून उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे बाहेर पडावे लागले. भारताच्या त्रिशा – गायत्री जोडीला चायनीज तैपाईच्या सीह पेइ शन आणि हंग एन-जू या जोडीने पराभूत करताना त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानी असलेल्या त्रिशा आणि गायत्री यांच्या जोडीला हसिह पेई शान आणि हंग एन-जू यांच्याकडून 17-21, 21-16, 10-21 असा पराभव स्वीकारला लागला. सीह – हंग यांच्या जोडीने चांगली सुरुवात करताना ८-५ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सीह – हंग यांच्या जोडीने सलग ५ गुणांची कामाची करून करून ही आघाडी १३-८ अशी वाढविली. त्यानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करताना १५-१५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर चायनीज तैपाईच्या खेळाडूनी आपला खेळ उंचावताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही संघांनी चांगली लढत दिली. त्रिशा आणि गायत्री यांनी दुसऱ्या सेटमध्ये ११-१० अशी एक गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ही आघाडी भारतीय जोडीने १७-१२ पर्यंत नेवून दुसरा सेट जिंकून सामना तिसऱ्या सेटपर्यंत खेचला.
China Open 2024 : उपांत्य फेरीच्या लढतीत अल्काराझ समोर मेदवेदेवचे आव्हान …
तिसऱ्या सेटमध्ये मात्र चायनीज तैपेईच्या जोडीने १४-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताच्या त्रिशा आणि गायत्रीने लढत देऊनही त्यांना सेट जिंकता आला नाही. तिसरा सेट जिंकून चायनीज तैपेईच्या सीह – हंग यांच्या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला.





