LSG vs MI : ‘…आता मला काही करायची गरज नाही’, या वक्तव्यानंतर रोहित शर्मा होतोय ट्रोल, पाहा VIDEO

LSG vs MI Rohit Sharma personal conversation video viral with Zaheer Khan : आयपीएल २०२५ चा १६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सराव दरम्यान खूप मेहनत घेतली आहे आणि खूप घाम गाळला आहे. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंची जुगलबंदीही दिसून आली. या दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, ‘आता मला काही करण्याची गरज नाहीये.’ ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.
रोहित शर्माच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल –
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये झहीर खानशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘जे जेव्हा करायचे होते, तेव्हा ते मी बरोबर केले. आता मला काही करायची गरज नाही.’ इतक्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंत मागून येतो आणि मिठी मारतो, ज्यामुळे संभाषण अचानक थांबते. दरम्यान जे वक्तव्य केले आहे, ते कशाबद्दल होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, चाहत्यांनी आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत रोहित शर्माला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे रोहित वादात सापडला असून चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.
Kya context mey bola you can’t judge in parts. Need to watch full video.
— iBRAINPOWERS (@ibrainpowers) April 4, 2025
He's talking about the Negative PR he did against Hardik …. His own country man , his country's biggest match winner.
Shame on you Vadapav 🤡
God's watching you @ImRo45— KOHLISTIC (@PRAGYA269) April 3, 2025
Selfish Greedy Rohit Sharma got exposed again😡🤡
Rohit Sharma created groupism in Mumbai team @mipaltan— SHADAB 🌙♥️ (@shadab_strom) April 4, 2025
गेल्या हंगामातही रोहितचा व्हिडीओ व्हायरल झाला होता –
झहीर खान सध्या एलएसजी संघाचा मार्गदर्शक आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. गेल्या हंगामातही रोहित शर्माचा कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक अभिषेक नायरसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो ‘माझे काय, हे माझे शेवटचे आहे.’ असे म्हणताना दिसला होता. यानंतर केकेआर फ्रँचायझीने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला होता. परंतु हा व्हिडीओ काढून टाकल्यानंतरही बराच गदारोळ झाला होता आणि रोहित शर्माही संतापला होता.
आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्माला त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. तो खराब फॉर्मशी झुंजत आहे चालू हंगामात आतापर्यंत त्याने तीन सामन्यात फक्त २१ धावा केल्या आहेत. एकदा तर तो शून्यावरही बाद झाला आहे. रोहित शर्मा हा २०११ पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत २६० आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ६६४९ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.





