Jasprit Bumrah : मुंबईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! बुमराहच्या कमबॅकबद्दल आली मोठी अपडेट्स, ‘या’ संघाविरुद्ध खेळताना दिसणार?

Jasprit Bumrah comeback update in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या रणधुमाळीत जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह वेगाने बरा होत आहे आणि तो लवकरात लवकर आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसू शकतो. ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नक्की कोणत्या संघाविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करु शकतो, याबद्दल जाणून घेऊया.
बुमराहच्या पुनरागमनाबद्दल अपडेट आली समोर –
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या पुढील दोन सामन्यांसाठी अद्याप उपलब्ध असणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान बुमराहलच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. दरम्यान बुमराहच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये फक्त एकदाच विजयाची चव चाखली आहे.
🚨 JASPRIT BUMRAH IS GETTING CLOSER TO RETURN IN THIS IPL 2025 🚨
– But Bumrah is set to miss Mumbai Indians' next two matches..!!! (ESPNcricinfo). pic.twitter.com/IxZbEvxPbR
— Tanuj (@ImTanujSingh) April 4, 2025
एमआयच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खूप वेगाने बरा होत आहे आणि तो लवकरच आयपीएल २०२५ मध्ये चमक दाखवताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानापासून दूर आहे. तथापि, बुमराह किमान पुढील दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. बुमराह लवकरच फिटनेस चाचणीच्या अंतिम फेरीतून जाणार आहे. जर जस्सी तंदुरुस्त झाला तर मुंबई इंडियन्ससाठी ते दिलासादायक ठरेल.
हेही वाचा – LSG vs MI : ‘हा स्वत:लाच लॉर्ड म्हणतोय…’, रोहितने चिडवताचं शार्दुल म्हणाला, ‘मग तूच तर नाव…’,पाहा VIDEO
बुमराह या सामन्यातून करणार पुनरागमन –
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. एमआयने स्पर्धेची सुरुवात सलग दोन पराभवांनी केली. पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर कडून पराभव पत्करावा लागला. तर, दुसऱ्या सामन्यात गुजरात ३६ धावांनी पराभव केला. मात्र, शेवटच्या सामन्यात, मुंबईने कोलकाताविरुद्ध ८ विकेट्सनी विजय मिळवत विजयाची चव चाखली. मुंबईचे पुढील दोन सामने लखनौ आणि आरसीबीविरुद्ध होणार आहेत. त्यानंतर १३ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात बुमराह पुनरागमन करु शकतो.





