LSG vs MI : लखनौने रोमांचक सामन्यात मारली बाजी, मुंबईला चारली पराभवाची धूळ, घरच्या मैदानावर जिंकला दुसरा सामना

LSG vs MI Lucknow Super Giants beat Mumbai Indians by 12 runs : लखनौ सुपर जायंट्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ मध्ये आपला दुसरा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने मिशेल मार्श आणि एडेन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत ८ बाद २०३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक ठोकले पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि मुंबईला निर्धारित षटकांत पाच बाद १९१ धावाच करता आल्या. मुंबईकडून सूर्यकुमारने ४३ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या.
रोमांचक सामन्यात लखनौने मुंबईला पाजले पाणी –
लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी १७ धावांच्या आत विल जॅक्स आणि रायन रिकलटन यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर, सूर्यकुमार आणि नमन धीर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि शानदार फलंदाजी केली आणि तिसऱ्या विकेट्ससाठी ६९ धावांची भागीदारी केली. परंतु, नमन धीरचे अर्धशतक हुकला आणि २४ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह ४६ धावा काढून बाद झाला. मुंबईने तिलक वर्माला प्रभावशाली खेळाडू म्हणून संघात आणले ज्यांनी सूर्याला चांगली साथ दिली.
A nail-biting thriller that goes #LSG's way ✨#MI fall short by 1️⃣2️⃣ runs as Avesh Khan and LSG hold their nerves to secure their 2nd win of the season! #TATAIPL | #LSGvMI | @LucknowIPL pic.twitter.com/4YV2QmtUD0
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
सूर्याची झुंज ठरली अपयशी –
सूर्यकुमारने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर आक्रमक खेळ सुरूच ठेवला. सूर्यकुमारला आवेश खानने बाद केले. सूर्यकुमार पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या क्रीजवर आला. शेवटच्या षटकाच्या अगदी आधी, तिलक वर्मा २५ धावा काढून रिटायर्ड आऊट झाला आणि त्याच्या जागी मिशेल सँटनर क्रीजवर आला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती.
हेही वाचा – LSG vs MI : हार्दिक पंड्याची कमाल! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
मुंबईला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती –
#MI need 2️⃣5️⃣ off 8️⃣!
Who's winning it?#TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/ZA8ZtrPEjw
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
हार्दिक पंड्याने आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, पण यानंतर आवेश धावांवर अंकुश लावत लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी झाला. त्याने या षटकात अवघ्या १० धावा खर्च केल्या. हार्दिकने १६ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या, तर सँटनरनेही दोन धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. लखनौकडून शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान आणि दिग्वेश सिंग राठी यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. या सामन्यासह मुंबईचा चार सामन्यांपैकी तिसरा पराभव ठरला. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स चार सामन्यातील दुसरा विजय ठरला.





