LSG vs MI : हार्दिक पंड्याची कमाल! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

LSG vs MI Hardik Pandya 1st captain take 5 wickets in IPL history : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने आयपीएल २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. त्याच्या नेतृत्त्वाखालील संघाच्या पराभवामुळे सतत टीका होत असलेल्या हार्दिकने या हंगामातील त्याच्या तिसऱ्या सामन्यात स्वतः जबाबदारी घेतली आणि त्याच्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिकने एकट्याने ५ विकेट्स घेत विक्रम प्रस्थापित केला.
हार्दिक पंड्याने रचला इतिहास –
हार्दिक पंड्याने ऋषभ पंत आणि निकोलस पूरन सारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यासह तो आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा पहिला कर्णधार बनला आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि मोठी धावसंख्या उभारली पण मुंबईसाठी कर्णधार हार्दिकने एका टोकापासून किल्ला सांभाळला आणि धाडसी लढा दिला.
5️⃣ wickets for HP. 204 runs to chase 👊#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/aHCL5JNbcn
— Mumbai Indians (@mipaltan) April 4, 2025
हार्दिक पंड्याने घेतल्याने ५ विकेट्स –
हार्दिकने त्याच्या पहिल्या षटकात एक विकेट्स घेतली आणि शेवटच्या षटकात २ विकेट्स घेत डावाचा शेवट केला. हार्दिकने त्याच्या स्पेलच्या प्रत्येक षटकात विकेट्स घेतल्या आणि ४ षटकात फक्त ३६ धावा देऊन पाच विकेट्स घेत इतिहास रचला. ज्यामध्ये नवव्या षटकात पहिल्यांदाच गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या हार्दिकने पाचव्या चेंडूवरच फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनला बाद केले. मुंबईसाठी ही मोठी विकेट्स होती. कारण पूरन फक्त १२ धावा करून बाद झाला.
हेही वाचा – LSG vs MI : मिचेल मार्शने रचला इतिहास! शिखर धवनचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत केला मोठा पराक्रम
हार्दिकला त्याच्या पुढच्या षटकात पुन्हा यश मिळाले आणि यावेळी त्याने लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. हार्दिक पंड्या इथेच थांबला नाही आणि त्याच्या तिसऱ्या षटकातही त्याने संघासाठी यश मिळवून दिले. हार्दिकने १८ व्या षटकात दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या एडन मार्करमला बाद करून आणखी एक मोठा धक्का दिला.
हेही वाचा – LSG vs MI : रोहित शर्माला लखनौविरुद्धच्या सामन्यातून का वगळले? कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले ‘हे’ कारण
हार्दिक पंड्या आयपीएल इतिहासातला ठरला पहिलाच कर्णधार –
▪ His first-ever 5-fer in T20s
▪ His best bowling figures in T20s
▪ Best bowling figures as captain in IPLAmid the onslaught, #HardikPandya led from the front with the ball in Lucknow! 👏#IPLonJioStar 👉 #LSGvMI, LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/55ZUBFVJVX
— Star Sports (@StarSportsIndia) April 4, 2025
२० व्या षटकातही त्याची अद्भुत कामगिरी सुरू राहिली आणि त्याने चौथ्या चेंडूवर स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरचा डाव संपवला. बाद होण्यापूर्वी मिलरने सलग चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारला. या फलंदाजाने फक्त १४ चेंडूत २७ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हार्दिकने आकाश दीपची विकेट घेऊन पाचवी विकेट घेत इतिहास रचला. विशेष म्हणदे हार्दिकने टी-२० कारकिर्दीत पहिल्यांदाच एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कमाल केली आहे. यासोबतच तो आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेणारा पहिला कर्णधारही बनला.





