LSG vs GT Mitchell Marsh not playing against Gujarat Titans : आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ला मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शशिवाय उतरावे लागले आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीदरम्यान घोषणा केली की मिशेल मार्श जागी दिल्लीचा फलंदाज हिम्मत सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला आज पदार्पणाची संधी मिळाली आहे. मिशेल मार्श का खेळत नाही? एलएसएलचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, मिशेल मार्श या सामन्यात खेळत नाही. कारण त्याची मुलगी आजारी आहे. मामार्श ऑस्ट्रेलियाला परतला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तो सध्या संघाचा भाग नाही. आता मिचेल मार्शच्या जागी हिम्मत सिंगला संघात स्थान मिळाले आहे. https://twitter.com/anandhumanoj666/status/1911005989354013166 कोण आहे हिम्मत सिंग? हिम्मत हा दिल्लीचा रहिवासी आहे आणि तो यापूर्वी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे. या हंगामाच्या मेगा लिलावात त्याला एलएसजीने ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले. हिम्मत सिंगने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ५५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये ५ वेळा अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट १३२.५१ आहे. आतापर्यंत त्याने एकूण ९१७ धावा केल्या आहेत. हेही वाचा – CSK vs KKR : आऊट की नॉट आऊट…धोनीच्या रिव्ह्यूवर पंचांकडून चूक? पेटला नवा वाद या हंगामातील मिचेल मार्शची कामगिरी – मिचेल मार्श या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. तो संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने डावाची सुरुवात करताना ५ सामन्यांमध्ये ४ अर्धशतके झळकावली आहेत आणि एकूण २६५ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू असला, तरी दुखापतीनंतर तो पुनरागमन करत असल्याने तो सध्या फक्त फलंदाजी करत आहे.