LSG vs GT : गुजरातला मोठा झटका! स्टार खेळाडू IPL 2025 मधून पडला बाहेर

LSG vs GT Gujarat Titans star Glenn Phillips ruled out of IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये २६वा सामना यजमान लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील एक स्टार खेळाडू अचानक घरी परतला आहे. याचा अर्थ असा की हा खेळाडू या हंगामात त्याच्या संघाचा भाग राहणार नाही. या खेळाडूला अलीकडेच क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला संघापासून वेगळे करण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने गुजरात टायटन्स संघ सोडला आहे. तो त्याच्या मायदेशी परतला आहे. बीसीसीआय लवकरच अधिकृत घोषणा करू शकते. मेगा लिलावात गुजरात टायटन्सने ग्लेन फिलिप्सला करोडोंना खरेदी केले. पण त्याला कोणत्याही सामन्यात संघाच्या प्लेइंग ११ मध्ये निवडण्यात आले नव्हते.
Glenn Phillips won't be able to finish the IPL 2025 season due to a groin injury sustained during the match against Sunrisers Hyderabad on April 6.
Wishing him a speedy recovery!#Gujarat #IPL2025 #GlennPhillips @IPL pic.twitter.com/aGMH5TMgnr
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 12, 2025
६ एप्रिल रोजी झाली होती दुखापत –
६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून क्षेत्ररक्षण करताना ग्लेन फिलिप्सला दुखापत झाली होती. या सामन्यात फिलिप्स गुजरातकडून पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला होत. पण थ्रो मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या स्नायूंना दुखापत झाली. यानंतर, त्याला त्याच्या सहकारी खेळाडूंच्या खांद्याच्या आधाराने मैदानाबाहेर जावे लागले. या दुखापतीपासून तो संघाच्या सरावातही दिसला नाही.
हेही वाचा – LSG vs GT : लखनौला मोठा धक्का! गुजरातविरुद्धच्या सामन्यातून मिचेल मार्शने अचानक घेतली माघार
ग्लेन फिलिप्सच्या जाण्याने गुजरातची वाढली चिंता –
ग्लेन फिलिप्सच्या बाहेर पडण्याने गुजरातची चिंता वाढली आहे. त्याच्या आधी कागिसो रबाडा देखील दक्षिण आफ्रिकेत परतला होता. तो संघात कधी सामील होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. अशा परिस्थितीत गुजरात संघात सध्या फक्त पाच परदेशी खेळाडू आहेत. ज्यामध्ये जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, राशीद खान, गेराल्ड कोएत्झी आणि करीम जनत यांची नावे आहेत. मात्र, सध्या संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गुजरात ५ सामन्यांत ४ विजयांसह अव्वल स्थानावर आहे.





