IPL 2024 (LSG vs DC Match 26) : बडोनी ठरला संकटमोचक, लखनौनं दिल्लीसमोर ठेवलं 168 धावांचे लक्ष्य…

Live Cricket Score, LSG vs DC Indian Premier League 2024 : आज IPL 2024 चा 26 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
येथील एकना स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 च्या 26 व्या सामन्यात प्रथमतः गोलंदाजीत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी कुलदीप यादवसह(3-20) कमाल करताना लखनौ सुपर जायंट्सच्या सुरुवातीच्या फलंदाजी फळीची वाताहत केली. अखेर, नवोदित फलंदाज आयुष बडोणीने 35 चेंडूंत 5 चौकार व एका षटकारासह 55 धावांची झंझावाती खेळी करताना लखनौचा डाव सावरला. त्याच्या कामगिरीमुळे लखनौने निर्धारित षटकांत 7 बाद 167 धावा उभारल्या.
Innings Break!
An unbeaten 55* from Ayush Badoni propels @LucknowIPL to 167/7 👌👌
Will it be enough for #DC? Chase coming up shortly!
Scorecard ▶️ https://t.co/0W0hHHG2sq#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/e1U1miEmI1
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
प्रथम फलंदाजी करताना लखनौला क्विंटन डी कॉकने चांगली सुरुवात करून दिली, पण तो 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनौचा कर्णधार के.एल. राहुलने जबाबदारी स्वीकारत 22 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, पण आयपीएल 2024 मध्ये त्याला दुसरे अर्धशतक झळकावता आले नाही. संघ सतत विकेट गमावत होता, त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांनी लखनौच्या संघावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, निकोलस पूरन 0 धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा आणि कृणाल पांड्या यांनाही फलंदाजीची जादू दाखवता आली नाही. यादरम्यान लखनौसाठी आयुष बडोणी तारणहार ठरला, त्याने 55 धावा केल्या आणि संघाला 167 धावांपर्यंत नेले.
लखनौ संघाने 94 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या, परंतु आयुष बडोणी आणि अर्शद खान यांनी संघाची मान वाचवली. दोघांमध्ये 73 धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. एकीकडे बडोनीने 35 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली, तर अर्शदने 16 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. लखनौच्या फलंदाजांनी शेवटच्या 3 षटकात 39 धावा काढत संघाची धावसंख्या 160 च्या पुढे नेली. यासह दिल्लीला आता विजयासाठी 168 धावा कराव्या लागणार आहेत.
दिल्लीकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. खलील अहमदने 2 बळी घेतले. मुकेश कुमार आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.





