Sanjiv Goenka Controversy : ‘हा घमंडी जोकर आहे, याच्यावर बंदी घाला!’, ललित मोदींची संजीव गोयंकावर सडकून टीका, BCCI ला केलं आवाहन
Sanjiv Goenka Controversy : आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी लखनऊ सुपर जायंट्सचे (LSG) मालक संजीव गोयनका यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत, त्यांना थेट 'जोकर' संबोधले आहे.

Lalit Modi on Sanjiv Goenka Controversy IPL 2026 : आयपीएल २०२६ चा हंगाम मैदानातील चौकार-षटकारांसोबतच मैदानाबाहेरील वादांमुळेही तापू लागला आहे. आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी लखनऊ सुपर जायंट्सचे (LSG) मालक संजीव गोयंका यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत, त्यांना थेट ‘जोकर’ संबोधले आहे. इतकेच नाही, तर मोदींनी बीसीसीआयकडे या संघावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.
१ एप्रिल रोजी इकाना स्टेडियमवर लखनऊ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये संजीव गोयंका कर्णधार ऋषभ पंतशी गंभीर चर्चा करताना दिसले. ही चर्चा पाहून चाहत्यांना २०२४ मधील केएल राहुलसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. याच मुद्द्यावरून ललित मोदींनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत संजीव गोयंकांवर हल्लाबोल केला आहे.
“मी असतो तर संघ मालकीच हिसकावून घेतली असती”
I told you this guy @DrSanjivGoenka owner of @LucknowIPL is a complete looser and joker of the highest order – i am seriously embarrassed with his behaviour. I created the @IPL for fans and players alike. Not for this to happen every time every year. If I was still Chairman and… https://t.co/5mHzg8RAY1
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) April 2, 2026
ललित मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “मी तुम्हाला आधीच सांगितले होते की संजीव गोयंका हा पूर्णपणे लूझर आणि सर्वात मोठा जोकर आहे. मी आजही आयपीएलचा चेअरमन असतो, तर त्याच्यावर तात्काळ बंदी घातली असती आणि संघाची मालकी कायमची काढून घेतली असती.” मोदींनी बीसीसीआयला आचारसंहितेचा हवाला देत कारवाई करण्याचे आवाहन केले असून, केवळ सत्तेत बसलेल्या लोकांची चापलूसी करून गोयंका सुटता कामा नयेत, असा इशाराही दिला आहे.
एलएसजी फ्रँचायझीकडून स्पष्टीकरण जारी –
Not everything you see is the true story, here’s the unfiltered post match vibes, when cameras don’t cut. pic.twitter.com/EiPMWrmlkQ
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 2, 2026
दुसरीकडे, वाद वाढत असल्याचे पाहून लखनौ सुपर जायंट्सने एक व्हिडीओ पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. “जे तुम्हाला दिसत आहे ते सत्य नाही. कॅमेरे बंद झाल्यावरची ही अनफिल्टर्ड मज्जा आहे,” असे कॅप्शन देत त्यांनी संजीव गोयंका आणि ऋषभ पंत यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे भासवले. स्वतः गोयंका यांनीही आपल्या संघावर आणि कर्णधारावर पूर्ण विश्वास असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. मात्र, ललित मोदींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आयपीएल वर्तुळात पुन्हा एकदा संघ मालकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





